गोव्याचे पर्यटनमंत्री अडचणीत येणार?

विलास ओहाळ
बुधवार, 16 जानेवारी 2019

मंगळवारी सचिवालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना 'घाटी ' हा शब्द स्थानिक लोक परराज्यातील लोकांना उद्देशून वापरतात. यावर आजगावकर यांनी घाटावर राहतात म्हणून ' घाटी ' असा अर्थ होतो, असे सांगितले . मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी २o१६ मध्ये दिलेल्या एका निवाड्यात 'घाटी ' हा शब्द अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 

पणजी : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी ' घाटी ' या शब्द उच्चाराचे समर्थन केले आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा शब्द अपमानास्पद असल्याचे दोन वर्षांपूर्वीच्या निवाडयात म्हटले आहे. जर कोणी सामाजिक संस्था किंवा विरोधी पक्षाने आजगावकर यांच्या समर्थनास हरकत घेतली तर त्यांना ते अडचणीचे ठरू शकते.

मंगळवारी सचिवालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना 'घाटी ' हा शब्द स्थानिक लोक परराज्यातील लोकांना उद्देशून वापरतात. यावर आजगावकर यांनी घाटावर राहतात म्हणून ' घाटी ' असा अर्थ होतो, असे सांगितले . मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी २o१६ मध्ये दिलेल्या एका निवाड्यात 'घाटी ' हा शब्द अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 

विरोधी पक्ष किंवा बिगर सरकारी सामाजिक संस्थेने यास हस्तक्षेप घेतल्यास आजगावकर यांना केलेले समर्थन अडचणीचे ठरू शकते .

Web Title: Goa tourism minister controversial statement