रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध

अवित बगळे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे आधीच वैतागलेल्या जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा सरकारी प्रकार असल्याची टीका महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

त्या म्हणाल्या, पुलाच्या कामामुळे आधीच मडगाव ते पणजी या 33 किलोमीटरच्या मार्गावर दररोज ये जा करणाऱ्या्ंचे हाल होत आहेत. उद्या चांगली सेवा मिळावी म्हणून काही प्रमाणात हाल सोसता येतात. महिला कॉंग्रेसने सरकारच्या तेथील गैरव्यवस्थापनाबाबत आवाज उठवला होता. सरकारने आकसाने तेथे जनेतेच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.  महिला कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तेथे वाहतुकीचे व्यवस्थापन केल्यास पुलाचे काम सुरु असताना कोणालाही त्रास जाणवणार नाही. मात्र सरकारच अस्तित्वात नसल्याने जनतेचे त्रास कोणी समजून घेत नाही.

कुठ्ठाळी ते वेर्णा हा रस्ता बंद करण्याची गरज नाही. दिलीप बिल्डकॉन या कंपनीला फायदा पोचवण्यासाठीच सरकार हा रस्ता बंद करू पाहत आहे. हा रस्ता सुरु असतानाच कंत्राटदारांने काम करणे अपेक्षित आहे. रस्ता बंद करण्याची करारात तरतूद होती तर त्याची माहिती सरकारने त्याचवेळी जनतेला का दिली नाही. आताच रस्ता बंद करण्याचा विषय़ आला कुठून अशी विचारणा करून त्या म्हणाल्या, चिखलीमार्गे वाहतूक वळवल्याने २१ किलोमीटरचा वऴसा पडणार आहे. सार्वनजिक वाहतूक बे भरवश्याचे असल्याने सर्वजण आपली वाहने घेऊन प्रवास करतात. त्यांना इंधनाचा अतिरीक्त पडणारा भार सरकार उचलणार आहे का.  सरकारचा हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न जनता व कॉंग्रेस हाणून पाडेल.

Web Title: Goa women congress oppose to close the road