पंजाबनंतर आपचे लक्ष्य विस्ताराचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Somnath Bharti

पंजाबनंतर आपचे लक्ष्य विस्ताराचे

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर आम आदमी पक्षाने (आप) विस्ताराचे लक्ष्य ठेवले आहे. तेलंगण, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांकडे मोर्चा वळविण्यात येणार असून एप्रिलमध्येच प्रचारास प्रारंभ करण्यात येईल. तेलंगणात पुढील वर्षी, तर इतर दोन राज्यांत यंदा निवडणूक होणार आहे.

दिल्लीतील आमदार सोमनाथ भारती यांनी तेलंगणचा दोन दिवसांचा दौरा केला. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर तेलंगणमध्ये पदयात्रा काढण्यात येईल. राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लवकरच गुजरात आणि हिमाचलचे दौरे करतील. दोन एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये त्यांचा रोडशो होईल. केजरीवाल तीन तारखेला गुजरातमधील पक्षनेत्यांची बैठक घेतील. सहा एप्रिल रोजी हिमाचलमधील मंडी येथे या दोघांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा होईल.

तेलंगणमधील दौऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पंजाबमधील क्रांतीनंतर इतर सर्व पक्षांमधील असंख्य नेत्यांचे मला दूरध्वनी येत आहेत. आम्ही मात्र सावध असून कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला किंवा वाईट पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला आम्ही प्रवेश देणार नाही.

- सोमनाथ भारती, आपचे आमदार

Web Title: Goal Expand After Punjab Gujarat Himachal Pradesh Including Telangana Somnath Bharti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..