गोव्याचे राजभवन लोकांसाठी होणार खुले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

पणजी : वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले दोनापावल येथील आलिशान असे राजभवन नूतन वर्षापासून लोकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. त्यामुळे ही नूतन वर्षाची भेट ठरणार आहे. मात्र, त्यासाठी लोकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागेल आणि प्रती व्यक्तीस 300 रुपये मोजावे लागणार आहेत. 

गोवा मुक्ती दिनी 19 डिसेंबर रोजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी राजभवन देशी आणि विदेशी पर्यटकांना खुले करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता येत्या 5 जानेवारी 2019 पासून दोनापावल येथील राजभवनाचे सौंदर्य पाहण्याची तसेच त्याचा इतिहास जाणून घेण्याची अनेकांची आता इच्छापूर्ती होणार आहे. राजभवन आठवड्यातील तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारीच फक्त लोकांसाठी खुले असणार आहे. यासाठी प्रथम लोकांना ऑनलाईन अगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.

Web Title: Goa's Raj Bhavan will be open to the people