मनुष्य-देव संबंध अतिशय खासगी 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

बंधुत्व, सहिष्णुता आणि दुसऱ्याचा मार्ग मान्य करण्याच्या संदेशातून सर्वजण एकाच मार्गाने एकाच देवाकडे पोचतात, असे मला वाटते. यातून जगात शांतता येऊन समृद्धी येईल. हा विचार करता रोहिंटन यांनी चांगले काम केले आहे. 
- टी. एस. टाकूर, सरन्यायाधीश 

नवी दिल्ली : मनुष्य आणि देव यांच्यातील संबंध हे अतिशय खासगी असून, अन्य कोणी त्यात दखल देऊ शकत नाही, असे मत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी रविवारी व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंटन एफ. नरिमन यांनी लिहिलेल्या "द इनर फायर, फेथ, चॉईस ऍण्ड मॉडर्न लिव्हिंग इन झोराष्ट्रीनीझम' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सरन्यायाधीश ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, ""राजकीय विचारसरणीपेक्षा धार्मिक युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. जगात धार्मिक धारणांमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस, नुकसान आणि रक्तपात झाला आहे. दुसऱ्यापेक्षा आपला मार्ग चांगला आहे, या धारणेतून माणूस एकमेकाला ठार करीत आहे. माझा धर्म काय? मी देवाशी कशाप्रकारे जोडला जातो? माझा आणि देवामधील संबंध हा पूर्णपणे खासगी असून, यात कोणी दखल देऊ शकत नाही. तुम्ही तुमचा देवाशी कसा संबंध ठेवायचा हे ठरवू शकता.'' 

बंधुत्व, सहिष्णुता आणि दुसऱ्याचा मार्ग मान्य करण्याच्या संदेशातून सर्वजण एकाच मार्गाने एकाच देवाकडे पोचतात, असे मला वाटते. यातून जगात शांतता येऊन समृद्धी येईल. हा विचार करता रोहिंटन यांनी चांगले काम केले आहे. 
- टी. एस. टाकूर, सरन्यायाधीश 

Web Title: god-human relation very private- CJI