भाजप खासदार म्हणतात, लक्ष्मीचा फोटो नोटांवर छापा कारण...

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

भगवान गणेश सर्व विघ्ने दूर करतात. त्याचप्रमाणे भारतातही नोटांवर लक्ष्मी देवीची प्रतिमा छापली पाहिजे. तेव्हाच भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल.

खंडवा : भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मी देवीची प्रतिमा छापण्याची गरज असल्याचा अजब दावा भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात 'स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले'त स्वामी यांनी सहभाग घेतला होता. भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून, महागाईच्या दरातही वाढ होत आहे. स्वामी यांनी यापूर्वीही नोटांवर लक्ष्मी देवीची प्रतिमा छापण्याची मागणी केलेली आहे.

निर्भया प्रकरण : नराधमांची फाशी लांबणीवर?

इंडोनेशियातील नोटांवर गणपतीची प्रतिमा छापण्यात आल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना स्वामी म्हणाले, की भगवान गणेश सर्व विघ्ने दूर करतात. त्याचप्रमाणे भारतातही नोटांवर लक्ष्मी देवीची प्रतिमा छापली पाहिजे. तेव्हाच भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. याबद्दल कोणाला वाईट वाटेल असे मला वाटत नाही. याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच योग्य प्रकारे देतील. 

सीएएवर स्वामी म्हणाले, की नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये संभ्रम निर्माण होईल असे काहीच नाही. काँग्रेस आणि महात्मा गांधीनीही याचे समर्थन केलेले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goddess Lakshmi On Notes May Improve Condition Of Rupee says Swamy