गोधरा प्रकरणातील 28 जण दोषमुक्त 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

2002 मध्ये गोधरा रेल्वे स्थानकावर डबा जाळल्याच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गांधीनगरमधील कलोल तालुक्‍यातील पलियाड गावामध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल घडविणे आणि तोडफोड करणे असे आरोप या 28 जणांवर ठेवण्यात आले होते.

अहमदाबाद - गोधरा घटनेनंतर उसळलेल्या दंगलीप्रकरणी गांधीनगर जिल्हा न्यायालयाने 28 जणांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. हे सर्व जण अनेक वर्षांपासून जामिनावर बाहेर होते.

2002 मध्ये गोधरा रेल्वे स्थानकावर डबा जाळल्याच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गांधीनगरमधील कलोल तालुक्‍यातील पलियाड गावामध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल घडविणे आणि तोडफोड करणे असे आरोप या 28 जणांवर ठेवण्यात आले होते. तसेच, येथील एका दर्ग्याचीही नासधूस केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

मात्र, या सर्वांविरोधात पुरेसे पुरावे नसणे, साक्षीदारांनी त्यांना अचूक ओळखण्यास असमर्थता दर्शविणे या कारणांमुळे त्यांना न्यायालयाने मुक्त केले. याशिवाय आरोप असणाऱ्यांबरोबर तडजोड होऊन नुकसानभरपाई मिळाल्याने त्यांच्याविरोधात तक्रार नसल्याचे साक्षीदारांनीच न्यायालयात सांगितले होते. 

Web Title: Godhra riots: 28 acquitted by Gujarat court after witnesses turn hostile