सीमाभागासाठी ‘गोकुळ’ मल्टिस्टेट हवाच

राजेंद्र हजारे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

निपाणी - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याची हालचाल सुरू असून तसा संचालक मंडळाचा आग्रह आहे. 

कर्नाटक सीमाभागातील दूधही मोठ्या प्रमाणात या संघाला जाते; पण अलीकडच्या काळात दूध वाढल्याने सीमाभागातील दूध संघाने नाकारले आहे. शिवाय गाय दूध न घेण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मल्टिस्टेटमुळे दूध उत्पादकांना चांगले दिवस येणार असल्याने सीमाभागातील दुधासाठी गोकुळ मल्टिस्टेट हवाच, असा सूर निपाणी व चिक्कोडी भागातील दूध उत्पादक संघांतून उमटत आहे. 

कर्नाटक सीमाभाग हा महाराष्ट्राच्या हद्दीला लागूनच असल्याने या भागातील सर्व घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यावर अवलंबून आहेत. अनेक वर्षांपासून येथून दूध संकलीत करून गोकुळ संघाला पाठविले जाते; पण अलीकडच्या काळात संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध वाढल्याचे कारण सांगून सीमाभागातील दूध नाकारले आहे. त्यामुळे या भागातील दूध उत्पादकांसमोर प्रश्‍नचिन्ह उभे आहे.

महाराष्ट्र शासन आपल्या कार्यक्षेत्रातील दुधाला प्रतिलिटर ५ रुपयाचे अनुदान देत आहे; पण सीमाभागातील दूध उत्पादकांना ते मिळत नाही. त्यामुळे संघ मल्टिस्टेट झाल्यास या भागातील सर्वच दूध गोकुळला जाऊन अनुदानही मिळणार आहे. सीमाभागातून दररोज १ लाख ३० हजार लिटर दूध गोकुळला पाठविले जाते. शिवाय संघाकडून जनावरांसाठी विविध योजना, त्यांची चिकित्सा, अन्य शिबिरे भरवून शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. 

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट होणे सीमाभागाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे या भागातील सर्व दूध उत्पादकांना दिलासा मिळून योग्य न्याय देखील मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. गोकुळ मल्टिस्टेट झाल्‍यास सीमाभागाला लाभच.

 - शशिकला जोल्ले, आमदार, निपाणी
 
Web Title: Gokul Multi State issue