Gold Price: सोने, चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरातील घसरण सुरुच असून आजही सोन्याच्या दरात घट झाली आहे.

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरातील घसरण सुरुच असून आजही सोन्याच्या दरात घट झाली आहे. मागील सत्रात सोने 50 हजार 325 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाले होते. जे आज 125 रुपयांनी स्वस्त होऊन 50 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

सोन्याचा दर मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत. सत्राच्या सुरुवातीला सोन्याचे दर 50 हजार 149 रुपयांपर्यंत गेले होते. मागील काही दिवसांपासून कोरोना लशींच्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसले आहे.

रुपयाच्या किंमतीत सुधारणा झाल्याने आणि सोन्याची मागणी कमी झाल्याने बुधवारी दिल्लीत सोने 357 रुपयांनी घसरून 50 हजार 253 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते, एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे चांदीही 532 रुपयांनी घसरून 62 हजार 693 रुपये प्रति किलो झाली होती.

2021 ऑटो इंडस्ट्रीसाठी भरभराटीचं! TATA आणि Mahindra कडून नव्या कारचे लॉचिंग

2020 च्या ऑगस्ट महिन्यात सोने, चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. सोने प्रति 10 ग्रॅमला 56 हजार 200 पर्यंत गेले होते. तर चांदीही प्रतिकिलोला 80 हजारांच्या जवळपास गेली होती.

31 टक्क्यांनी वाढले दर- 
भारतात 2020 मध्ये जागतिक पातळीनुसार सोन्याच्या किमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये भारतात सोन्याच्या दराने 56 हजार 200 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर चांदी प्रति किलो 80 हजारांपर्यंत गेल्या रुपयांच्या आसपास होती. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल अशी आशा विश्लेषकांनी व्यक्त केली.

SpaceXचे एलन मस्क ठरले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार- 
भारतात 2020मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलरची होती. चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी लागतो. 

भारताकडील सोन्याचा साठा- 
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and silver rate falls from last four days due to corona