सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; नवे दर...

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ.

आठ दिवसांत झाली दीड हजार रुपयांची वाढ

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता 10 ग्रॅम सोन्यासाठी 43,170 रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 700 रूपयांनी वाढला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 43 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचे मूल्य घसरल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम सरासरी 450 रुपयांनी वाढ झाली. तर चांदीच्या दरातही किलोमागे जवळपास एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Image result for gold prices

दोन महिन्यात दुसरं द्विशतक, हा तर बापासारखाच जबरदस्त फलंदाज निघाला 

आठ दिवसांत दीड हजार रुपयांची वाढ

मागील आठ दिवसांत सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे भावही वाढले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices today hit record high Rs 43170 for 10 Grams