शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.  

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने  2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.

यापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.  

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांना दीडपट किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता याबाबतची घोषणा मोदी सरकारच्या शेवटच्या वर्षी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाणार आहे.

Web Title: Good news for farmers 14 Seeds Benefits