Sundar Pichai Home: कोट्यवधी कमावणाऱ्या सुंदर पिचाईंनी विकले चेन्नईतील घर; वडिलांना अश्रू अनावर|Google CEO Sundar Pichai's Chennai home sold, father is in tears | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sundar Pichai Home

Sundar Pichai Home: कोट्यवधी कमावणाऱ्या सुंदर पिचाईंनी विकले चेन्नईतील घर; वडिलांना अश्रू अनावर

Sundar Pichai Home Sold: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे वडिलोपार्जित घर विकण्यात आले आहे. त्यांचे घर तमिळ अभिनेता आणि चित्रपट निर्माते सी मणिकंदन यांनी विकत घेतले आहे.

सुंदर पिचाई यांचे वडिलोपार्जित घर चेन्नईत होते. सुंदर वयाच्या २० वर्षांपर्यंत या घरात राहत होते. हे घर किती रुपयांना विकले गेले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हे घर विकताना सुंदर पिचाई यांचे वडील भावूक झाले.

द हिंदू बिझनेस लाईनच्या बातमीनुसार, मणिकंदन एक प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात होते. पिचाई यांच्याकडे एक घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे कळताच, त्यांनी लगेच ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतील अशोक नगर या निवासी भागात हे घर आहे.

मणिकंदन हे स्वतः रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत:

द हिंदू बिझनेस लाइनशी बोलताना मणिकंदन म्हणाले, ''मी स्वतः रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. माझ्या ब्रँड चेल्लाप्पा बिल्डर्स अंतर्गत, मी सुमारे ३०० घरे बांधली आणि वितरित केली आहेत.

सुंदर पिचाई यांनी आपल्या देशाचा गौरव केला आहे. ते राहत असलेले घर विकत घेणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.''

मणिकंदनने सांगितले की, जेव्हा ते सुंदर पिचाईच्या आई-वडिलांना भेटले तेव्हा पिचाईच्या आईने स्वतः त्यांच्यासाठी फिल्टर कॉफी बनवली. पहिल्या भेटीत त्यांच्या वडिलांनी मणिकंदनला कागदपत्रे देऊ केली होती. ते म्हणाले,

'पिचाई यांचे वडिल माझ्यासाठी नोंदणी कार्यालयात तासनतास थांबले. आणि कागदपत्रे सुपूर्द करण्यापूर्वी सर्व आवश्यक कराचे पैसे देखील भरले.

कागदपत्र देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. कारण ही त्यांची पहिली मालमत्ता होती. सुंदर पिचाई यांचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचे पालनपोषण चेन्नईत झाले आहे. पण इंजिनीअरिंग करण्यासाठी ते १९८९ मध्ये IIT खरगपूरमध्ये गेले.