केरळसाठी गुगलकडून 7 कोटींची मदत

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गुगलने 'गुगल पर्सनल फाइंडर' टूलची निर्मिती केली आहे, अशी माहिती आनंदन यांनी दिली.

नवी दिल्ली : केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीनंतर देशभरातून 'मदतीचा हात' मिळत आहे. त्यानंतर आता केरळच्या पुनर्वसनासाठी गुगलकडून 7 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

याबाबत गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले, की केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुगलर्स आणि Google.org कडून 7 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. 'गुगल क्राइसिस रिस्पॉन्स टीम'ने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गुगलने 'गुगल पर्सनल फाइंडर' टूलची निर्मिती केली आहे, अशी माहिती आनंदन यांनी दिली.

दरम्यान, केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील सुमारे 22 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Web Title: Google donate 7 crore for Kerala