डॉ. मुथ्थूलक्ष्मी रेड्डी यांना गुगल डुडलचे अभिवादन

टीम ईसकाळ
मंगळवार, 30 जुलै 2019

तमिळनाडूच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मानही  मुथ्थूलक्ष्मी यांनाच जातो. तसेच महिलांसाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला गेला व त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    

डॉक्टर मुथ्थूलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस! मुलांच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या. शिक्षण घेण्यास विरोध होत असतानाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्या महिलांच्या अधिकारासाठी लढत राहिल्या. मुथ्थूलक्ष्मी यांना मानवंदना म्हणून त्यांच्या जन्मदिनी गुगलने डुडल साकारले आहे. 

Related image

30 जुलैला तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर आई-वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. पण त्यांना समाजसेवेच्या ध्येयाने त्यांना महिलांसाठी लढायची इच्छा होती. वैद्यकीय प्रशिक्षणानंतर त्यांची स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांच्याशी ओळख झाली व त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी लढण्याची शपथ घेतली. 

तमिळनाडूच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मानही त्यांनाच जातो. तसेच महिलांसाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला गेला व त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google doodle on Dr Muthulakshmi Reddi for her birth anniversary