गुगल डूडलद्वारे भारताच्या 'या' जलतरणपटूचा गौरव, वयाच्या पाचव्या वर्षीच जिंकले होते सुवर्णपदक

Aarti Saha Doodle
Aarti Saha Doodle

नवी दिल्ली - आज गुगल डुडलवर एक भारतीय महिला झळकली आहे. ही महिला म्हणजे भारताच्या दिवंगत जलतरणपटू आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आरती साहा आहेत. आज त्यांचा ८० वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांचा गौरव केला आहे. 


वयाच्या पाचव्या वर्षी सुवर्णपदक जिंकरणारी आरती -
आरती यांचा  २४ सप्टेंबर १९४० मध्ये कोलकात्यामधील बंगाली कुटुंबामध्ये  जन्म झाला. त्यांना दोन भावंडे होते. लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले सुर्वण पदक वयाच्या पाचव्या वर्षीच जिंकले. ११ व्या वर्षांपर्यंत आरती या जलतरणपटू म्हणून उदयास आल्या. लहान वयामध्ये त्यांनी या क्षेत्रात उंच भरारी घेतली.


'या' चित्रकार महिलेने काढले डूडलवरील चित्र  -
आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त गुगलने डूडलद्वारे त्यांचा गौरव केला आहे. त्यावर जे चित्र दिसतंय ते कोलकात्यामधील कलाकार लावण्या नायडू यांनी काढले आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगी हे चित्र नेहमी प्रेरणा देईल, अशी अपेक्षा लावण्या यांनी व्यक्त केली आहे.


पंडीत जवाहरलाल नेहरूंनी केली होती मदत -

आरती यांनी १९४९ साली भारतातील सर्वात वेगवान जलतरणपटू म्हणून नाव नोंदवले. १९५१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये डॉली नाझीर यांचे सर्व विक्रम मोडीत काढले. तसेच १९५१ च्या ऑलिम्पिकमध्ये आरती यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.  ऑलिम्पिकनंतर आरती यांनी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारावर लक्ष केंद्रित केले. गंगा नदीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या जलतरण स्पर्धांमध्येही आरती सहभागी होऊ लागल्या. १९५२ साली बांगलादेशमधील जलतरणपटू ब्रोजेन दास यांनी इंग्लीश खाडी पोहून पार करत अशाप्रकारचा विक्रम करणारा पहिला आशियाई जलतरणपटू होण्याचा मान मिळवला. तेव्हा आरती यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी दास यांनी आरतीला १९५३ साली आयोजित करण्यात आलेल्या बुटलीन इंटरनॅशनल क्रॉस चॅनेल स्विमिंग रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. एवढी लोकप्रियता आणि यश मिळवल्यानंतरही या स्पर्धेसाठी इंग्लंडला जायला पैसे उभारण्यात आरती यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी आरतीला पाठिंबा देत सरकारच्या माध्यमातून तिला मदत केली.

हेही वाचा - धक्कादायक! PM किसान योजनेत 5.96 लाखांपैकी 5.38 लाख लाभार्थी बनावट​
इंग्लीश खाडी पोहण्याच्या पहिल्या प्रयत्नात अपयश -
आरती यांनी देशबंधू पार्कमधील तलावात सलग आठ तास पोहण्याचा सराव केला होता. त्यानंतर त्यांनी एकदा १५ तास पोहण्याचाही सराव केला होता. जवळजवळ सहा वर्ष सराव केल्यानंतर त्या २४ जुलै १९५९ रोजी इंग्लंडला पोहचल्या. इंग्लीश खाडी पोहण्याच्या पहिल्याच प्रयत्नात विघ्न आलं. आरती यांची पायलेट बोट तासभर उशिरा आल्याने त्यांना उशिरा सुरुवात करावी लागली. मात्र, सुमद्रातील नैसर्गिक परिस्थिती तोपर्यंत बरीच बदलली होती. त्यामुळे त्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी पाच मैलांनंतर माघार घ्यावी लागली.


१९५९ ला इंग्लीश खाडी पोहण्याचा विक्रम -
आरती यांनी २९ सप्टेंबर १९५९ मध्ये इंग्लीश खाडी पोहण्याचा दुसरा प्रयत्न केला. यावेळी सलग १६ तास २० मिनिटांच्या वेळात त्यांनी ४२ मैलांचे अंतर पार करत इंग्लीश खाडी पोहोचण्याचा विक्रम केला. यासोबतच त्यांनी इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावरही भारताचा तिरंगा फडकावला. 


मॅनेजरसोबत लग्न -
आरती यांनी या पराक्रमानंतर त्यांचे मॅनेजर डॉक्टर अरुण गुप्ता यांच्याबरोबर १९५९ मध्ये लग्न केले. पुढील वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना अर्चना नावाची एक मुलगी होती. १९९९ साली आरती यांच्या सन्मानार्थ पोस्टाने तिकीटही जारी केले होते. त्यानंतर आरती यांनी रेल्वेमध्येही काम केले होते. त्यांचे ४ ऑगस्ट १९९४ साली निधन झाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com