आधुनिक भारतीय समाजाच्या निर्मात्याचे गुगल डूडल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

देशातील सामाजिक आणि धार्मिक रचनेतील सुधारणा त्यांनी सुचवली. त्यासाठीच्या आंदोलनाचे ते प्रणेते आहेत. 

भारतातील महान समाज सुधारक आणि विद्वान राजा राम मोहन राय यांना त्यांच्या 246व्या जयंतीनिमित्त गुगलने डूडल समर्पित केले आहे. 'आधुनिक भारतीय समाजाचे निर्माते' अशी त्यांची ओळख होती. देशातील सामाजिक आणि धार्मिक रचनेतील सुधारणा त्यांनी सुचवली. त्यासाठीच्या आंदोलनाचे ते प्रणेते आहेत. 

मुघल सम्राज्याविषयी त्यांनी ब्रिटीश राजवटीसमोर जो पक्ष मांडला होता त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती. राजा राम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 साली झाला. बंगाल मधील राधानगर गावात एका ब्राह्मण कुटूंबात त्यांचा जन्म झाला. अरबी, फारसी, इंग्रजी, ग्रीक, हिब्रू इत्यादी भाषांचे ज्ञान त्यांना होते. हिंदू, मुस्लिम, ईसाई आणि सूफी या धर्मांचाही त्यांचा तगडा अभ्यास होता. 15 वर्षाच्या वयात त्यांनी मुर्ती पुजेला विरोध करणारे पुस्तक लिहिले होते. त्यांच्या समाजसुधारणेची किंमतही त्यांना मोजावी लागली होती. कट्टरवादी कुटूंबातून त्यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यांनी दूरदूरच्या यात्रा केल्यात आणि विविध ठिकाणचे ज्ञान आणि अनुभव प्राप्त केले. 

समाजातील कुप्रथांविरोधात त्यांनी 20 ऑगस्ट 1828 ला 'ब्रह्म समाजा'ची स्थापना केली. हे पहिले सामाजिक-धार्मिक सुधार आंदोलन होते. सती प्रथेला भारतात खुप पाळले जात होते पण 1829 मध्ये या प्रथेला संपविण्याचे श्रेय राजा राम मोहन राय यांना जाते. शिवाय भारतीय शिक्षण पध्दतीतील बदलांना त्यांचे समर्थन होते. इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य विज्ञानाचे शिक्षण भारतीय शिक्षणात आणले तर आपली शिक्षण पध्दत प्रगत होईल. हे धेय्य समोर ठेऊनच त्यांनी हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. जी त्या काळातील सर्वात आधुनिक संस्था होती. 

27 सप्टेंबर 1833 साली मेंदूज्वराने राजा राम मोहन राय यांचे निधन झाले. ब्रिटेन मधील ब्रिस्टल नगरच्या आरनोस वेल स्मशान येथे त्यांची समाधी आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: google doodle pays tribute to raja ram mohan roy