शायर कैफी आझमींना गुगल डूडलकडून मानवंदना!

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

गूगल नेहमीच समाजात मोठं स्थान असणाऱ्या दिग्गजांचा सन्मान आपल्या डूडलद्वारे करत असतं. आजही त्यांनी सुंदर डूडल तयार करत कैफी आझमींना अभिवादन केले आहे. 

प्रसिद्ध कवी, गीतकार व समाजसेवक कैफी आझमी यांची आज 101वी जयंती! विशेष म्हणजे गूगल डूडलद्वारे त्यांना 101व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. गूगल नेहमीच समाजात मोठं स्थान असणाऱ्या दिग्गजांचा सन्मान आपल्या डूडलद्वारे करत असतं. आजही त्यांनी सुंदर डूडल तयार करत कैफी आझमींना अभिवादन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for kaifi azmi

चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध शायर म्हणून ओळखले जाणारे कैफी आझमी यांचा जन्म 14 जानेवारी 1919मध्ये उत्तर प्रदेशमधल्या आझमगढ येथे झाला होता. त्यांचे नाव सैयद अतहर हुसैन रिजवी असे होते. लहानपणापासूनच त्यांच्यातील कवी, शायर दिसून आला होता. त्यानंतर विसाव्या शतकातील प्रसिद्ध पटकथालेखक, कवी म्हणून कैफी यांनी ओळख मिळवली. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. त्यानंतर स्वातंत्र्यसंग्रामात महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. वृत्तपत्रात काम करण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली.   

Video : रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन पहा कसे असते

उर्दू कवितांसाठी आजही त्यांना ओळखले जाते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासाठी त्यांनी बरेच काम केले. त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अभिनेत्री शबाना आझमी या त्यांच्या कन्या आहेत. 

Image result for kaifi azmi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google doodle on Poet kaifi azami 101 birth anniversary