सनईवादक बिस्मिल्ला खाँ यांना गुगल डुडलचे अभिवादन

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

नवी दिल्ली : गुगलने सनईवादक भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांना त्यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त डुडल तयार करून अनोखे अभिवादन केले आहे. 

बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म 21 मार्च 1916 साली बिहारमधील संगीतकार कुटूंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच खाँ यांनी त्यांचे काका व प्रसिद्ध सनईवादक अली बक्ष विलायतु यांच्याकडून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सनईचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. खाँ यांचे पूर्वज मुघल काळात बिहारच्या भोजपूरमध्ये सरदारांच्या महाली वादक म्हणून आपली कला पेश करत असत. बिस्मिल्ला खाँ यांचे वडिल बिहारच्या डुमराव संस्थानात सनईवादनाचे काम करायचे. 

Bismillah khan

बिस्मिल्ला खाँ यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर व प्रथम प्रजासत्ताकदिनी सनईवादन करून देशवासियांना मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर या राष्ट्रीय सणांना त्यांचे सनईवादन हे दूरदर्शनला थेट प्रक्षेपण म्हणून दाखवले जायचे. भारतरत्नासोबतच त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच संगीत नाटक अकादमी या पुरस्काराने गौरविण्यात आले. 21 ऑगस्ट 2006 साली नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.    
 
Web Title: Google makes doodle on 102nd birth anniversary of shehnai maestro Ustad Bismillah Khan