'ईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती. तसेच फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही इव्हीएम घोटाळा कसा करतात हे ठाऊक आहे असे या सय्यद शुजाने म्हटले आहे.

नवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती. तसेच फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही इव्हीएम घोटाळा कसा करतात हे ठाऊक आहे असे या सय्यद शुजाने म्हटले आहे.

दिल्लीतल्या 2015 मधल्या निवडणुकांमध्येही घोळ होणार होता, परंतु वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं 70 पैकी 67 जागा जिंकल्या अन्यथा भाजपनं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा शुजाचा दावा आहे. ही मशिन कशी हॅक करता येतील हे आपण दाखवू शकतो असंही त्यानं म्हटलं आहे.

सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा 2009 ते 2014 या कालावधीत कर्मचारी होता असं त्याने सांगितले आहे. त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आलं होतं, परंतु कपिल सिब्बलवगळता अन्य कुणी गेलेलं नाही. ही पत्रकार परिषद लंडनमध्ये सुरू असून शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे.

फक्त भाजपच नाही तर काँग्रेस, बसपा, सप, यांच्यासह डझनभर पक्षांना इव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होतं असा दावाही त्याने केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुका या इव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टकेला आहे. लंडनमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत व्हिडिओ लिंकद्वारे सय्यद शुजा हा सायबर एक्स्पर्ट सहभागी झाला असून त्याने भाजपवर आणि इतर पक्षांवर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाचे अधिकारी ही पत्रकार परिषद तसेच प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक बघत असून लवकरच आयोग आपलं म्हणणं मांडेल असं सांगण्यात आलं आहे.

Web Title: Gopinath Munde Was Aware Of Evm Tampering So Was Murdered