गोरखपूर: बालके मृत्युप्रकरणी डॉ. खान अटकेत

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

गोरखपूर, ता. 2 (पीटीआय) : बाबा रघुवरदास रुग्णालयात गेल्या महिन्यात दोन दिवसांत तीस बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी आज डॉ. काफिल खान यांना अटक केली. मृत्यूच्या घटनेनंतर खान यांना पदावरून हटविण्यात आले होते. ते संबंधित रुग्णालयातील निर्णय अधिकारी होते.

या प्रकरणात झालेली ही तिसरी अटक आहे. यापूर्वी या सरकारी रुग्णालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा शुक्‍ला यांना तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. आरोपपत्रामध्ये नमूद असलेल्या नऊ जणांविरोधात काल (ता. 1) न्यायालयाने नोटीस बजावली होती. आरोप असलेल्या उर्वरित सहा जणांना अद्याप अटक झालेली नाही. दहा आणि अकरा ऑगस्टला ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश सरकारने मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे.

Web Title: gorakhpur news dr kaphil khan arrested