बंगाल सरकारविरोधात 'दार्जिलिंग छोडो' चळवळ...

पीटीआय
रविवार, 6 ऑगस्ट 2017

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतीयांना ज्याप्रमाणे गुलामगिरीची वागणूक मिळाली. अगदी तसे वर्तन बंगाल सरकार गोरखा बांधवांसोबत करत आहे. या सरकारकडून आमचा अतोनात छळ सुरु असून, या भागात राहणाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य नाही

दार्जिलिंग - वेगळ्या गोरखालॅंडच्या मागणीसाठी दार्जिलिंगमध्ये सुरु असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार गोरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी केला असून, बंगाल सरकारविरोधात 'दार्जिलिंग छोडो' चळवळ सुरु करावी, असे आवाहन त्यांनी गोरखा बांधवांना केले आहे.

ब्रिटीश राजवटीविरोधात महात्मा गांधींनी सुरु केलेल्या 'भारत छोडो' चळवळीला 8 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असून, या पार्श्वभूमिवर पश्‍चिम बंगालमधील सरकारविरोधात ''बंगाल दार्जिंलिंग छोडो' ही चळवळ हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत 9 ते 15 ऑगस्टदरम्यान विविध ठिकाणी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती गुरुंग यांनी दिली.

''ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतीयांना ज्याप्रमाणे गुलामगिरीची वागणूक मिळाली. अगदी तसे वर्तन बंगाल सरकार गोरखा बांधवांसोबत करत आहे. या सरकारकडून आमचा अतोनात छळ सुरु असून, या भागात राहणाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य नाही.' असेही गुरुंग म्हणाले.

तिरंगा यात्रेत सहभाही होणार
भारत छोडो आंदोलनास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार, आम्ही या यात्रेत सहभाही होऊन देशाचा स्वातंत्रदिन साजरा करु. पण त्याबरोबर प.बंगाल सरकारचा निषेध ही करु, असे बिमल गुरुंग यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Gorkhas to chant ‘Bengal–Darjeeling Choro’ on Independence Day