गाैरी लंकेश हत्या प्रकरणः बेळगावातील ‘त्या’ तरुणाची बंगळुरात कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बेळगाव - शहरातून बुधवारी (ता. ८) ताब्यात घेतलेल्या तरुणाला आज एसआयटी पथकाने बंगळूरमधील न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची बंगळूरमधील कारागृहात रवानगी करण्यात केली अल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरत जयवंत कुरणे (३५, रा. संभाजी गल्ली महाद्वार रोड) असे संशयिताचे नाव आहे.

मारेकऱ्यांना आसरा व जेवण देणाऱ्यांमध्ये भरत कुरणे याचा सहभाग असल्याची माहिती एसआयटी पथकाच्या तपासात उघडकीस आली होती. त्यामुळे पथकाने बुधवारी भरत कुरणेला ताब्यात घेतले. त्याची दिवसभर चौकशी व अन्य कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्याला बंगळूरला नेले. आज दिवसभर त्याची चौकशी या प्रकरणाशी संबंधित काही माहिती जमविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर त्याला बंगळूरमधील विशेष न्यायालयासमोर उभे केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे सूत्रांकडून समजते. 

Web Title: Gouri Lankes Murder case followup

टॅग्स