गौरी लंकेश यांचे मारेकरी बाँब निर्मितीत तरबेज

गौरी लंकेश यांचे मारेकरी बाँब निर्मितीत तरबेज

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयित आरोपी बॉम्ब तयार करण्यात तरबेज होते व त्यांनी हेच ज्ञान इतरांनाही शिकविले होते, अशी माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळे याने आपल्या सहकाऱ्यांसाठी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र व कर्नाटकात आयोजित केले होते. बॉम्ब तयार करण्याबरोबरच त्याचा वापर, पोलिसांची हिंसा कशी रोखायाची, त्यांची दिशाभूल कशी करायाची, याचे प्रशिक्षणही देण्यात येत होते, अशी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांचा त्रास रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते. पोलिसांचा त्रास सहन करण्याची तयारी करून घेण्यासाठी अमोल काळे प्रशिक्षणार्थींना विद्युत शॉक देत होता. महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या स्थानिक संस्थेच्या लोकप्रतिनिधीने हे मान्य केले आहे.

अमोल काळे याने २०१५ पासूनच काही शिबिरांचे आयोजन केले होते. त्यांना गुरूजी नावाच्या व्यक्तीने व शरद काळसकर याने प्रशिक्षण दिल्याचे समजते. गौरी हत्येनंतर बॉम्ब व एअरगन बेळगावातील अज्ञातस्थळी लपवून ठेवण्यात आल्याचे समजते. शरद कळसकर याने एसआयटीकडे ही गोष्ट कबूल केली असल्याचे सांगण्यात आले.

अमोल काळे व त्याचे सहकारी कच्या बॉम्बला लड्डू म्हणून संबोधित होते. बेळगाव व मडिकेरी येथील जंगलातील फार्म हाऊसमध्ये प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. हिंदू धर्माबरोबरच मुस्लीम धर्मातील रितीरिवाजांची शिबिरात माहिती देण्यात येत होती. त्याचे नेतृत्व अमोल काळेकडेच होते. हिंदू धर्माविषयी व्याख्याने देण्यात येत होती. धर्माची अवहेलना करण्यात आल्याचे व्हिडिओ दाखविण्यात येत होते, अशी माहिती एसआयटीने न्यायालयाला दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com