बेळगाव : पोलिस बंदोबस्तात सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू

मिलिंद देसाई
शनिवार, 1 जून 2019

हलगा गावातील सांडपाणी प्रकल्पाचे काम करण्यासाठी संबंधित जागी चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या कामाला स्थानिक शेतकर्‍यांनी आक्रमक होत विरोध केला होता. या प्रकल्पाचे काम काल (शुक्रवार) शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाले आहे.

बेळगाव : हलगा गावातील सांडपाणी प्रकल्पाचे काम करण्यासाठी संबंधित जागी चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या कामाला स्थानिक शेतकर्‍यांनी आक्रमक होत विरोध केला होता. या प्रकल्पाचे काम काल (शुक्रवार) शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाले आहे.

'शेतकर्‍यांना विश्वासात न घेता काम सुरू करू नये', अशी मागणी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली होती. त्यामुळे काल हे काम थांबविण्यात आले होते. 

पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणत्याही प्रकारचे नोटीस न देताच बुधवारपासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी लावून खोदाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी कामाला विरोध करण्यासाठी जमलेल्या 20 हुन अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा गावाजवळील सुपीक जमिनीचे भू-संपादन करण्यास शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून विरोध दर्शविला आहे. तसेच याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवीत उभ्या पिकातून कामास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून काही दिवसांपूर्वी बायपास रस्त्याचे कामही पोलिस बंदोबस्तात हाती घेण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government assures Police protection for sewage project in Belgaum