उद्यापासून पाच दिवस बँका बंद (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

चालू आठवड्याच्या शेवटी सरकारी बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बॅंका बंद राहणार आहेत. बँक अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद राहणार आहेत.

मुंबई- चालू आठवड्याच्या शेवटी सरकारी बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बॅंका बंद राहणार आहेत. बँक अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक आणि विजया बॅंक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून बॅंक कर्मचाऱ्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच या संपावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा...

कर्मचारी 21 डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. ख्रिसमस आणि वर्षअखेरीस फिरायला जाणाऱ्यांना 21पूर्वीच पैशांची तजवीज करावी लागणार आहे. शुक्रवारी (ता. 21) संप, २२ ला चौथा शनिवार, २३ ला रविवारची सुटी, सोमवारी (ता. 24) बॅंका उघडतील. मात्र बहुतांश कर्मचारी रजेवर दिसतील आणि 25 तारखेला ख्रिसमसची सुटी असेल. बँका बंद असल्याने एटीएमवर ताण येणार आहे.

Web Title: Government Bank Employee On Strike vedio