चीनच्या आणखी ४७ ॲपवर बंदी; क्लोन ॲप असल्याने केंद्राची कारवाई

china-app
china-app

नवी दिल्ली - सीमेवर कुरापत काढणाऱ्या चीनला पुन्हा दणका देताना केंद्र सरकारने आणखी ४७ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपची नावे जाहीर झाली नसली तरी याआधी बंदी घातलेल्या ५९ ॲपचेच हे क्लोन असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. 

गलवान खोऱ्यात १५ आणि १६ जूनला चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवान हुतात्मा झाल्याने सरकारने आक्रमक भूमिका घेत चीनवर डिजिटल स्ट्राईक केला होता.  टिकटॉक, युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर, वुईचॅट, शेअरईट यासारख्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्यात आली होती. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदीचे पाऊल उचलले होते.  मात्र, बंदी घातलेल्या बहुतांश अॅपचेच क्लोन बनविण्यात आल्याचे आढळल्यानंतर त्यावरही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. 

आणखी काही ॲप रडारवर
केंद्र सरकारने आत्तापर्यंत १०६ अॅपवर बंदी घातली आहे तसेच २७५ चिनी अॅपची यादी तयार केली असून त्यावर आगामी काळात बंदी घातली जाऊ शकते. या यादीमध्ये पबजी, जिली यासारख्या ॲपचा समावेश आहे. भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांचा डेटा बेकायदेशीरपणे चोरणे, खासगीपणाच्या नियमांचे उल्लंघन करणे यासारखे प्रकार या ॲपद्वारे झाले आहेत काय, याची चौकशी केली जात असून भविष्यात चिनी इंटरनेट कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कारवाईमुळे मोठा आर्थिक फटका
चिनी ॲप वापरणारा एक मोठा वर्ग आहे, तीनशे दशलक्षपेक्षा अधिक लोक हे ॲप वापरतात, भारत सरकारने घातलेल्या बंदीमुळे चीनला आता ही बाजारपेठ गमवावी लागणार आहे. देशातील स्मार्टफोन वापरणाऱ्या दोन तृतीयांश लोकांनी चिनी ॲप डाउनलोड केले असे बोलले जाते. आता या ॲपवर बंदी घालण्यात आल्याने चीनची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com