हिस्सा विक्री प्रक्रियेत सरकारचा सहभाग नाही : आयडीबीआय

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : आयडीबीआय बॅंकेतील 51 टक्के हिस्सा भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) खरेदी करणार असून, यात सरकारचा सहभाग असणार नाही, असे बॅंकेने मंगळवारी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : आयडीबीआय बॅंकेतील 51 टक्के हिस्सा भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) खरेदी करणार असून, यात सरकारचा सहभाग असणार नाही, असे बॅंकेने मंगळवारी स्पष्ट केले. 

आयडीबीआय बॅंकेचा 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची खुली बोली 3 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत एलआयसीने लावली आहे. हा हिस्सा एलआयसी विकत घेणार आहे. याबाबतची घोषणा एलआयसीने ऑक्‍टोबरमध्ये केली होती. प्रतिसमभाग 61.74 रुपये दराने 12 हजार 602 कोटी रुपयांना एलआयसी हा हिस्सा खरेदी करणार आहे. बॅंकेने म्हटले आहे, की केंद्र सरकारकडून बॅंकेला 3 डिसेंबरला पत्र मिळाले आहे. एलआयसीकडून होणाऱ्या हिस्सा खरेदी प्रक्रियेत सरकार कोणताही सहभाग घेणार नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

बॅंकेतील एलआयसीचा हिस्सा 51 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यास बॅंकेच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास मंडळाने जूनमध्ये आयडीबीआय बॅंकेतील एलआयसीचा 10.82 टक्के हिस्सा 51 टक्‍क्‍यांवर नेण्यास मंजुरी दिली. सध्याच्या नियमांनुसार, विमा कंपनीला कोणत्याही सूचीबद्ध वित्तीय कंपनीत 15 टक्केपेक्षा अधिक मालकी हिस्सा ठेवता येत नाही.

Web Title: Government does not participate in the share sale process says IDBI