टोलमाफी 2 डिसेंबरपर्यंत; वाहनचालकांना दिलासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

5 डिसेंबरपर्यंत पाचशेच्या फाटक्‍या नोटा स्विकारणार

नवी दिल्ली- वाहतुक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी व वाहनधारकांना नोटाबंदीचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीला 2 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 2 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली होणार नाही. याचसोबत राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्‍यावर 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 15 डिसेंबरपर्यंत पाचशेच्या फाटक्‍या नोटा स्विकारल्या जातील, असेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

"राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीला वाढ देण्यात आली आहे,'' असे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. भारतीय स्टेट बॅंकेच्या सहयोगाने राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्‍यावर पुरेसे स्वाईप मशीन बसविण्यात येऊन वाहनधारकांना असुविधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा नोटाबंदीचा फटका बसलेल्या लोकांना दिलासा मिळाला.

टोलमाफीची चौथी मुदतवाढ
केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतर 11 नोव्हेंबर रोजी टोलमाफी जाहीर केली होती. ही टोलमाफी या आधी 14 नोव्हेंबर, त्यानंतर 18 नोव्हेंबर आणि त्यानंतर 24 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. अशा प्रकारने केंद्र सरकारने आतापर्यंत चार वेळा टोलमाफीला मुदतवाढ दिली आहे.

Web Title: Government extends toll exemption on national highways