...तर मिळणार विमान तिकिटाचे पैसे परत

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

''जर विमान कंपन्यांच्या चुकीमुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले तर विमानकंपन्यांनी विमान तिकिटाचे पूर्ण पैसे द्यायला हवे. जर विमान कंपन्यांनी तसे न केल्यास दुसऱ्या विमानाचे तिकिटाची व्यवस्था करायला हवी. यासाठी विमानकंपन्यांनी विमानप्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेऊ नये. हा नियम देशांतर्गत आणि परदेशातील विमान कंपन्यांसाठीही लागू करण्यात येणार आहे''.

- जयंत सिन्हा, नागरी उड्डाण राज्यमंत्री

नवी दिल्ली : विमानाचे उड्डाण रद्द होणे, उड्डाणास उशिर होणे यांसारख्या घटना अनेकदा घडत असतात. या सर्व प्रकारामुळे विमानप्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, यापुढे विमान कंपन्यांच्या चुकीमुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले तर संबंधित विमानकंपन्यांना विमान तिकिटाचे पूर्ण पैसे परत करण्याच्या सूचना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

या नव्या नियमानुसार विमानप्रवाशांना विमानाचे तिकिट रद्द केल्यानंतर रकमेचा पूर्ण परतावा मिळणार आहे. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले, की ''जर विमान कंपन्यांच्या चुकीमुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले तर विमानकंपन्यांनी विमान तिकिटाचे पूर्ण पैसे द्यायला हवे. विमान कंपन्यांनी तसे न केल्यास दुसऱ्या विमानाचे तिकिटाची व्यवस्था करायला हवी. यासाठी विमानकंपन्यांनी विमानप्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेऊ नये. हा नियम देशांतर्गत आणि परदेशातील विमान कंपन्यांसाठीही लागू करण्यात येणार आहे''.

Web Title: Government Gives Big Relief To Air Passengers On Flight Delay will get Refund