'गोव्यातील सरकार घटनाबाह्य'

'गोव्यातील सरकार घटनाबाह्य'

मडगाव- गोव्यात सरकार घटनाबाह्य पदध्तीने चालत असून हे गोमंतकीयांनी पहिली संधी मिळेल तेव्हा हे सरकार गोमंतकियांनी झिडकारून द्यावे असे आवाहन माजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री जयपाल रेड्डी यांनी येथे केले. 

मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित काॅंग्रेसच्या जनआक्रोश यात्रेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री फ्रांसिस सार्दीन, माजी मुख्यमंत्री व फोंड्याचे आमदार रवी नाईक, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार नीळकंठ हळर्णकर, फिलीप नेरी राॅड्रिग्ज, क्लाफास डायस, विल्फ्रेड (बाबाशान) डिसा, अखिल भारतीय काॅंग्रेसचे सरचिटणीस व गोवा प्रभारी डाॅ. चेल्ला कुमार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो, युवा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, काॅंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शंकर किर्लपार्लकर, दक्षिण गोवा काॅंग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, उत्तर गोवा काॅंग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, माहिती हक्क कार्यकर्ते राजन घाटे यावेळी उपस्थित होते. 

आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करू. पण, प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची त्यांची नैतिक जबाबदारी आहे. पण, ते सत्तेला चिकटून बसले आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले. 

गोव्यातील सरकार मुख्य सचिव चालवत आहेत. सभापती हे विधनासभेचे असतात. पण, गोव्यातील सभापती अर्घे मुख्यमंत्री बनले आहेत. ही स्थिती जनतेने सहन करण्याच्या पलीकडील असून गोमंतकीयांनी हे सरकार झिडकारून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

पर्रीकर संरक्षण मंत्री होते तेव्हा 14 एप्रिल 2014 रोजी पंतप्रधाना नरेंद्र मोदी राफेल करारासाठी फ्रांसला गेले होते. या दौऱ्यात त्यांनी पर्रीकर यांना नेले नव्हते. या दौऱ्यात 60 हजार कोटींचा करार झाला होता. पर्रीकरांना याची कल्पना नव्हती. मोदी फ्रांसहूून आल्यानंतर पर्रीकर यांना या काराराची माहिती देण्यात आली. आणि पर्रीकर यांनी या करारास मान्यता दिली. हा प्रकार आश्चर्यकारक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची सूचना मोदी करत नाही. मोदींचे कोणते तरी रहस्य पर्रीकर यांच्यापाशी असावे, असा आरापही त्यांनी केला. गोव्यातील सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकाही होत नाहीत. गोव्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही, असाही आऱोप त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com