आता चंद्राला गवसणी घालायला 'चांद्रयान 3' सज्ज!

वृत्तसंस्था
Wednesday, 1 January 2020

चांद्रयान 2 मध्ये चांगले काम झाले. जरी अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ऑर्बिटर काम करत आहे. पुढच्या 7 वर्षांपर्यंत आपल्याला माहिती पाठवत राहिल. आता चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

बंगळूर : चांद्रयान 2 मोहिमेच्या अपयशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) मोठे मनोबल देत केंद्र सरकारने चांद्रयान 3 मोहिमेला परवानगी दिली आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी याबाबतची माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इस्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमामध्ये सिवन बोलत होते. सिवन म्हणाले, की चांद्रयान 2 मध्ये चांगले काम झाले. जरी अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ऑर्बिटर काम करत आहे. पुढच्या 7 वर्षांपर्यंत आपल्याला माहिती पाठवत राहिल. आता चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दुसऱ्या स्पेस पोर्टसाठी जमीन संपादीत करण्यात आली असून थूटुकुडी इथं उभारणी करण्यात येईल. चांद्रयान 2 मोहिम आमच्यासाठी पूर्णपणे अपयशी नव्हती. यातून आम्ही खूप शिकलो.

राजकारणापासून आम्ही नेहमी दूर असतो : बिपीन रावत

चांद्रयान 2 मोहिमेद्वारे चंद्राच्य दक्षिण भागात मानवरहीत यान उतरविण्याची भारताची संधी काही महिन्यांपूर्वी थोडक्यात हुकली होती. चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरवर असतानाच विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. त्यामुळे भारताची ही मोहिम यशस्वी होऊ शकली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government has approved Chandrayan-3 the project is ongoing says K Sivan