... यासाठी सरकार विमानतळांजवळील जमिनी देणार भाड्याने!

Airport
Airport

नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरण (एएआय) आता देशातील प्रमुख आठ विमानतळांजवळील 759 एकर जमिनीचा अर्थपूर्ण वापर करण्याच्या विचारात असून यासाठी लवकरच जमिनींचे मूल्यांकन करण्यात येईल.

या विमानतळांजवळच खासगी कंपन्यांना वेअरहाउस, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उभारण्याची परवानगी देण्यात येईल. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाचा वापर हा अन्य विमानतळांवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जाईल, अशी माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कोलकता विमानतळाजवळील 145 एकर, अमृतसर विमानतळाजवळील 45 एकर, भुवनेश्‍वरमध्ये 45 एकर, जयपूरमध्ये 35 एकर, वाराणसीमध्ये 60 एकर, लखनौमध्ये 217 एकर, रायपूरमध्ये 80 एकर आणि तिरुपती विमानतळाजवळील 117 एकर जमीन निश्‍चित करण्यात आली आहे.

या सगळ्या जमिनी विमानतळाला लागून असून त्या भाडेतत्त्वावर दिल्यास या माध्यमातून मोठा महसूल मिळू शकतो. यातून मिळणारा पैसा अन्य विमानतळांवरील पायाभूत सेवांच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. 

देशातील 94 विमानतळे तोट्यात 

भारतीय विमान वाहतूक प्राधिकरण हे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. देशभरातील 129 विमानतळांचे व्यवस्थापन पाहण्याचे काम या प्राधिकरणाकडे आहे. या आधीच्या 2017 आणि 18 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 94 विमानतळे तोट्यात गेली होती.

हा तोटा भरून काढण्यासाठी विमानतळाजवळील जमीन ही खासगी कंपनी अथवा संघटना यांना 25 ते 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली जाणार असून, त्यातून निश्‍चित असे आर्थिक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या माध्यमातून मिळणारा पैसा हा बिगर हवाई वाहतुकीतून मिळणारा महसूल म्हणून ओळखला जाईल. 

सरकार काढणार निविदा 

या संदर्भातील जमीन निश्‍चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच निविदा काढण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याचवर्षी विमानतळालगतच्या जमिनींचे परीक्षण आणि मूल्यांकन करण्याचे सूतोवाच केले होते.

लखनौ, अहमदाबाद, जयपूर, मंगळूर, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी येथील विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी खासगी विकासकांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. या सहाही विमानतळांच्या निविदा या अदानी समूहाला देण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com