फेसबुक, केंब्रिज अनालिटिकास भारत सरकारची नोटीस

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली : डेटा लिकप्रकरणी केंद्र सरकारने फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटिकाला नोटीस बजावली असून, त्यांचे उत्तर आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे आज माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

प्रसाद म्हणाले, की भारतीय नागरिकांच्या डेटासंबंधी भारत सरकार सजग असून, दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली आहे आणि आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुकला पाच प्रश्‍नांची विचारणा केली आहे. अन्य कंपन्यांसाठी फेसबुकच्या डेटाचा वापर केला गेला आहे काय? अशी विचारणा करण्यात आली असून, येत्या 7 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे सांगितले आहे.

अशाच प्रकारची नोटीस केंब्रिज ऍनालिटिका कंपनीलाही पाठवली आहे. ब्रिटिश कंपनी केंब्रिज ऍनालिटिकाचा तपास इंग्लंडच्या संसदीय समिती करणार असून, त्यासंदर्भात बोलण्यास रविशंकरप्रसाद यांनी नकार दिला.

ते म्हणाले, की ब्रिटिश संसदीय समितीच्या एका सदस्याचे मत प्रसिद्ध झाले असून, त्यावर मला काही मत व्यक्त करायचे नाही. मात्र, समितीने अहवाल पाठविल्यास त्यावर मत व्यक्त करण्याचा विचार करू. 

Web Title: Government of India issues notice to Facebook, cambridge analytica