साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देणे सरकारचा स्वार्थी निर्णय : शंकराचार्य  

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी काल (बुधवार) नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज, पंडित योगेंद्र महंत, कॉम्प्युटर बाबा आणि भय्यू महाराज अशा पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचे आदेश जारी केले. या आदेशानंतर मध्यप्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री चौहान यांच्यावर सर्वच स्तरातून सवाल उपस्थित केला जात आहे. 

भोपाळ : मध्यप्रदेश सरकारकडून काल (बुधवार) पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता मध्यप्रदेश सरकारवर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''सरकारने घेतलेला हा निर्णय स्वार्थीपणाचा आहे. सरकारकडून ज्या लोकांना हे पद दिले जाते ते सन्मानजनक असते. ज्या साधूंना लोकं ओळखतही नाही अशा लोकांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. असे व्हायला नको होते'', असे शंकराचार्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी काल (बुधवार) नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज, पंडित योगेंद्र महंत, कॉम्प्युटर बाबा आणि भय्यू महाराज अशा पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचे आदेश जारी केले. या आदेशानंतर मध्यप्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री चौहान यांच्यावर सर्वच स्तरातून सवाल उपस्थित केला जात आहे. 

याबाबत रामबहादूर शर्मा यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठात याचिका दाखल केली. यामध्ये याचिकाकर्त्याने सांगितले, की सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विचार करायला हवा. या सर्व साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याने त्यांचे वर्तन अचानकपणे बदलले आहे.

Web Title: Government For Its Own Selfish Motive Giving MoS Status To Babas says Swami Swaroopanand