गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरती

वृत्तसंस्था
शनिवार, 14 मार्च 2020

-  विविध सरकारी भागात 4.75 लाख नोकऱ्या सध्या उपलब्ध होणार

नवी दिल्ली : सध्या नोकरी मिळविण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. सरकारी असो किंवा खासगी क्षेत्र पण नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. मात्र, आता सरकारी नोकऱ्यांची भरती लवकरच होणार आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासगी क्षेत्रात किंवा सरकारी विभागात नोकरी मिळवायची कशी याची माहिती मिळत नाही. मात्र, विविध सरकारी भागात 4.75 लाख नोकऱ्या सध्या उपलब्ध होणार आहेत. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. 

jobs

जितेंद्र सिंह म्हणाले, की 2019-20 या वर्षात यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भरती बोर्डच्या एकूण 1,34,785 पदांच्या भरतीसाठी शिफारस केली आहे. यूपीएससी 4399, रेल्वे भरती बोर्ड 116391 आणि एसएससी 13995 पदांची भरती करणार आहे. तसेच जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, की याशिवाय पोस्ट विभाग आणि सुरक्षा मंत्रालयाने 341907 रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government jobs will fulfill 475000 lacs post soon says jitendra singh