सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटं सांगितलं : काँग्रेस

वृत्तसंस्था
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर कॅग अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. राफेल करारावर याचप्रकारे निर्णय आला आहे. जर हा अहवाल आला नसेल तर सरकारने खोटे का बोलले? त्यामुळे सरकारने यावर माफी मागावी, असे काँग्रेसचे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (शनिवार) सांगितले. 

खर्गे म्हणाले, ''राफेल प्रकरणात न्यायालयासमोर सरकारला ज्या गोष्टी योग्यरितीने मांडणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. अॅटर्नी जनरलने याप्रकारे बाजू मांडली, की संसदेत हा अहवाल सादर झाला आणि पीएसने अहवाल पाहिला. अशाप्रकारे दाखविण्यात आले. जर पीएससी याप्रकरणाची चौकशी करत असेल तर साक्ष-जबाब पाहते. मात्र, न्यायालयाला चुकीची माहिती देण्यात आली. त्याआधारावरच चुकीचा निर्णय आला''. 

जर हा अहवाल आला नसेल तर सरकारने खोटे का बोलले? सरकारने माफी मागावी. त्यामुळे सरकारला याप्रकरणात क्लिन चिट कशी मिळू शकते? जर कोणतीही गोष्ट अंधारात ठेऊन केली जात असेल तर ही बाब योग्य नाही, असेही खर्गे म्हणाले.  

Web Title: The government lied to the Supreme Court says Congress Leader Kharge