टोल भरताय? मग ही बातमी वाचाच!

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

- टोलदराबाबात आहे सरकारचा महत्त्वाचा विचार. 

नवी दिल्ली : महामार्गावरून (हायवे) प्रवास करताना टोल भरावा लागत असतो. मात्र, आता या टोलबाबत केंद्र सरकार नवी नियमवाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नव्या नियमावलीनुसार वाहनाचा प्रकार, दर याबाबत नवे वर्गीकरण केले जाणार असून, खासगी कारच्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

टोलच्या नियमावलीत आवश्यक बदल करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय नवी योजना आणणार असल्याची शक्यता आहे. यासाठी 'बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप' (बीलीजी) या संस्थेकडून नवा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) 2008 च्या नियमावलीत बदल केला जाणार आहे. एनएचएआयच्या माध्यमातून नव्या प्रक्रियेचा आराखडा पूर्णत्वास नेण्यात येईल. 

तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे टोलदर सर्वांत जास्त असून, खासगी वाहनांचे टोलदर खूपच कमी आहेत. सध्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे टोलदर कमी करून प्रवाशी कारचे टोलदर वाढवायला हवे, असा अहवाल बीसीजीने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government may come out with new toll policy