Pharma Companies News : देशातल्या 18 औषध कंपन्यांचे परवाने रद्द; 20 राज्यांमध्ये केली तपासणी

Pharma Companies News
Pharma Companies Newsesakal

नवी दिल्लीः केंद्र सरकारने बनावट औषध निर्मिती करणाऱ्या १८ कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. देशातील ही मोठी कारवाई समजली जातेय.

केंद्राने २० राज्यामध्ये ७६ कंपन्यांची तपासणी केली होती. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीडीआयने ही कार्यवाही केली. सरकारने आता त्यापैकी १८ कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. 'एएनआयने' अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

केंद्र सरकारने 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले असून 26 फार्मा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बनावट औषध आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाईचा एक भाग म्हणून हे आदेश आले आहेत.

भारताचे औषध नियंत्रक विभागाने ७६ औषध कंपन्यांची तपासणी केली होती. केंद्र आणि राज्य पथकांद्वारे अचानक तपासणी करण्यात आली आणि 20 राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com