'यूपी' सरकार लावणार 22 कोटी झाडे

Plants
Plants

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने यंदा राज्यभर 22 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला असून, यासंदर्भात सर्व उच्चाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी राज्य सरकारच्या नर्सरीमधून मोफत रोपांचे वाटप केले जाणार असून, 2019-20 या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे वन विभागाचे मुख्य सचिव कल्पना अवस्थी यांनी सांगितले.

राज्यातील सर्वच भागांमध्ये रोपे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा इरादा असून, राज्यातील पर्यावरणाच्या सुधारणेबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, म्हणून हे वृक्षारोपण केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com