ग्राहकांचा प्रचंड फायदा, पेट्रोल तब्बल 1 पैशाने स्वस्त !

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने सांगितले, की टायपिंगच्या चुकीमुळे वेबसाईटवर 60 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पेट्रोलचे दर हे 1 पैशाने स्वस्त करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : सलग 16 दिवसांपासून वाढलेले पेट्रोलचे दर आज 60 पैशांनी स्वस्त झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर 60 पैसे नाहीतर 1 पैशाने स्वस्त झाल्याचे सांगितले. पेट्रोलचे दर 60 पैशांनी स्वस्त झाल्याचे ही 'प्रिंटिंग मिस्टेक' असल्याचे सांगत नवे दर काही तासानंतर पेट्रोलियम कंपन्यांच्या वेबसाइटवर देण्यात आले. त्यामध्ये पेट्रोल 1 पैशाने स्वस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि गेल्या अनेक दिवसांपासून वाढत चाललेले पेट्रोलचे दर यांमुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. तसेच पेट्रोलचे दर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असताना आज (बुधवार) पेट्रोलचे दर 60 पैशांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही तासानंतर पेट्रोलचे दर 1 पैशाने स्वस्त झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबत पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने सांगितले, की टायपिंगच्या चुकीमुळे वेबसाईटवर 60 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पेट्रोलचे दर हे 1 पैशाने स्वस्त करण्यात आले आहेत.

Web Title: Government Reduces Petrol Prices by 1 paisa