गोवा ते तिरूपती सरकारी सेवा ; पर्यटन फेरीचे आयोजन

अवित बगळे
शनिवार, 23 जून 2018

गोव्यातून तिरूपतीला जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन सरकारने या फेरीचे आयोजन करण्याचे ठरविले. यापुढे वालांकणी, शिर्डी व वैष्णोदेवी फेऱ्यांचे आयोजनही सरकार करणार आहे. सीबर्ड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने गोवा ते तिरूपती ही फेरी आयोजित केली जाणार आहे.

पणजी : गोवा सरकारच्या गोवा पर्यटन विकास महामंडळाने गोव्यातून तिरूपतीला जाण्यासाठी नियमित दौऱ्याचे आयोजन केले आहे. येत्या 2 जुलै रोजी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर आणि पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल यांच्या हस्ते या फेरीची सुरवात करून दिली जाणार आहे.

गोव्यातून तिरूपतीला जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन सरकारने या फेरीचे आयोजन करण्याचे ठरविले. यापुढे वालांकणी, शिर्डी व वैष्णोदेवी फेऱ्यांचे आयोजनही सरकार करणार आहे. सीबर्ड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने गोवा ते तिरूपती ही फेरी आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाला सध्या 4 हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यात तिरपती ते तिरुमला प्रवास, दर्शन तिकीट, एक वेळची न्याहरी आणि तिरुपती येथील दुपारच्या जेवणाचा समावेश आहे. या फेरीदरम्यान बंगळूर येथे 12 तासांचा थांबा असेल, त्यादरम्यान वास्तव्य वा बंगळूर दर्शन व्यवस्था अधिक शुल्क घेऊन केली जाणार आहे.

म्हापसा येथून सायंकाळी साडेसहा वाजता ही बस निघेल. जगभरातील पर्यटक गोव्यात येत असताना गोमंतकीय मात्र इतर ठिकाणी पर्यटन किंवा देवदर्शनासाठी जात असल्याची दखल घेत ही व्यवस्था सरकारी पातळीवर करण्यात येत आहे.

Web Title: Government services from Goa to Tirupati Tourism