विदेशी पर्यटकांच्या समस्यांसाठी समितीची स्थापना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने भारतभेटीस आलेल्या विदेशी पर्यटकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने विदेशी पर्यटकांना येणाऱ्या अडचणींसह अन्य काही बाबींचा अभ्यास करण्यासाठी आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप, 'अर्थमंत्रालयाने अतिरिक्त सचिव दर्जाची आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे. परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ सहसचिवांचाही या समितीमध्ये समावेश आहे. या समितीचे मार्गदर्शन, सल्ला आणि शिफारशींची आम्ही प्रतिक्षा करत आहोत.' भारत भेटीला आलेल्या काही परदेशी पर्यटकांना त्यांची व्हिसा फिस जुन्या नोटांमध्ये स्वीकारली जाईल का आणि त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याबाबत मार्गदर्शन हवे असल्याचेही स्वरुप यांनी सांगितले. याशिवाय "ज्या अनिवासी भारतीयांकडे पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा आहेत त्यांनी तातडीने भारतात येऊन नोटा बदलणे आवश्‍यक आहे का? त्यांना त्यांच्याकडील जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा कशा मिळतील? आणि परदेशातील काही चलन बदलण्यासंदर्भातही काही प्रश्‍न असल्याचे ते म्हणाले.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय होऊन आठ दिवस उलटून गेल्यानंतरही नोटा बदलण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. राजधानी दिल्लीतील बहुतेक एटीएममध्ये रक्कम नसल्याचे चित्र आहे. याशिवाय हैदराबाद आणि देशातील अन्य शहरांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

Web Title: Government sets up panel to look into concerns of tourists, NRIs