कर्नाटकातील सरकार 'स्टेबल' : देवेगौ़डा

H_D_Devegowda
H_D_Devegowda

बंगळूर : कर्नाटकातील आघाडी सरकारला धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून (जेडीएस) कोणत्याच प्रकारचा धोका नाही. तसेच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा कोणताच प्रस्ताव मी पुढे केला नसल्याचे स्पष्टीकरण माजी पंतप्रधान व जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेगौडा म्हणाले, "राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन मी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना केले होते. विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक येणार असल्याचे मी कधीच म्हणालो नाही. दिल्लीत राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. कर्नाटक सरकारला धक्का पोचेल, असे कोणीच वक्तव्य करू नये, असे त्यांना आवाहन केले होते. याशिवाय, अन्य कोणत्याच दुसऱ्या विषयावर मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली नाही.'' 

आघाडी सरकारमुळे कॉंग्रेस अडचणीत येईल, हा विचार प्रसारमाध्यमांतून आला आहे. यावर मी कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही. सिद्धरामय्या यांच्या सल्ल्यावरूनच जेडीएसच्या वाट्याचे एक मंत्रिपद अपक्ष आमदारांना दिल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनीच आघाडी सरकारचा प्रस्ताव पुढे केला. सोनिया गांधींच्या सूचनेवरून मी या प्रस्तावावर चर्चा केली.

या वेळी मी मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्री व्हावेत, असा विचार पुढे केला. परंतु, कुमारस्वामीच मुख्यमंत्री व्हावेत, असा विषय कॉंग्रेस नेत्यांनीच पुढे केला, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com