भारताचे 'हिंदू राष्ट्र' करण्याचा प्रयत्न- ओवैसी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

हैदराबाद- मोदी सरकार हे भारताचे 'हिंदू राष्ट्र' करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ऑल इंडिया मजलीस ए इतहादूल मुसलिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ओवैसी म्हणाले, 'मोदी सरकार हे मुस्लिम नागरिकांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतात. विविधतेमुळे भारताची ताकद आणि सौंदर्य टिकून आहे. परंतु,  निधर्मीपणा नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान दसऱयावेळी भाषण करताना धर्माबद्दल बोलले होते. देशातील नागरिकांना समान नागरी हक्क हवा आहे.'

'सरकारला समान नागरी हक्क व गोहत्येबाबत काही देणे-घेणे नाही,' असेही ओवैसी म्हणाले.

Web Title: Government trying to convert India into a ‘Hindu rashtra’- Owaisi