कलम 370बाबत 'असा' घेतला सरकारने निर्णय

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा निर्णय सरकारने शांततेत विचार करून घेतला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा निर्णय सरकारने शांततेत विचार करून घेतला आहे.

सोमवारी, जम्मू काश्मीरातील हिंसाचाराच्या जखमा सात दशके वागविणाऱ्या भारताच्या इतिहासाला नवे व एतिहासिक वळण देणारा आजचा दिवस ठरला. काश्मीरला अन्य भारतापेक्षा खास दर्जा देणाऱ्या कलम 370 ला हद्दपार करण्याचे आश्वासन भाजपने आपल्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. 

गेल्या चार दिवसांत काश्मीरमधे शेकडोच्या संख्येने उतरवलेल्या सुरक्षा दलांच्या तुकड्या, अमरनाथ यात्रा मध्येच बंद करण्याचे निर्देश, शहा यांनी काल दुपारपासूनच सुरू केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व लष्कर प्रमुखांच्या लागोपाठच्या बैठकांचे सत्र, शहा यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेली दीर्घ चर्चा व पाठोपाठ झालेली मंत्रिमंडळाची विशेष बैठक या घटनाक्रमाची साखळी त्यावेळी पूर्ण झाली जेव्हा शहा यांनी राज्यसभेत सकाळी साडेअकरानंतर विधेयक मांडताना केलेली घोषणा यांची संगती सुस्पष्ट आहे.

विस्तारित संसदीय अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात मोदी सरकारने हे विधेयक आणून संकल्पपूर्तीचा नवा अध्याय लिहिला. मोदी-शहांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government was taken decision in this way of section 370