सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर

Prakash Jawadekar
Prakash Jawadekar

पणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते आज गोवा विद्यीपाठाच्या 31 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा, कुलगुरु वरुण साहनी यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी आणखी एक घोषणा केली की, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकींग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत लहान विद्यापीठांचेही मुल्यांकन केले जाईल. सरकार शिक्षणपद्धती अद्ययावत करण्यासाठी नवनवे उपक्रम राबवत आहे. गुणवत्ता, संशोधन आणि नवकल्पना या तीन मुलभूत घटकांवर ‘परिणाम आधारीत’शिक्षणपद्धतीवर सरकारचा भर आहे, असे जावडेकर याप्रसंगी म्हणाले.

नॅक आणि इतर मुल्यांकन पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यात येत आहेत. आयआयटी आणि आयआयएम यांनाही नॅकच्या मूल्यांकनात दर पाच वर्षांनी सहभागी होण्यास सांगितले आहे.

सरकारच्या ‘स्वयम’ या प्रणालीचा लाभ 23 लाख विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना होत आहे. तसेच राष्ट्रीय डिजीटल संग्रहालयात 1 कोटी 65 लाख पुस्तकं सामान्यांसाठी मोफत उपलब्ध आहेत. याशिवाय सरकारने शाळांमध्ये विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वृद्धीसाठी ‘अटल टिंकरींग लॅब’ सुरु केले आहे. आज सुमारे तीन हजार शाळांमध्ये ‘अटल टिंकरींग लॅब’ कार्यरत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ सुरु केले आहे. आज हे जगातील सर्वात मोठे हॅकेथॉन ठरले आहे, असे जावडेकर यांनी याप्रसंगी सांगितले.

दीक्षांत सोहळ्यात बोलताना राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना पालकांची जबाबदारी स्वीकारण्याचे आव्हान केले. तसेच स्वच्छ भारत मोहिमेचा दूत या नात्याने स्वच्छतेची कास धरण्यास सांगितले.

गोवा विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच 10 हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात 8,313 पदवीधारक, 1,625 पदव्युत्तर आणि 39 पी.एचडी धारक आहेत. मनोरा, राया येथील साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी महाविद्यालयाची स्वच्छ महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com