यूपीत माजी केंद्रीय मंत्र्यावरील बलात्काराचा खटला मागे

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 6 मार्चला याबाबत पत्र देण्यात आले होते. या पत्रानुसारच चिन्मयानंद यांच्यावर असलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शहाजहाँपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील बलात्काराचा खटला मागे घेतला आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने हा गुन्हा मंगळवारी मागे घेतला.

स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 6 मार्चला याबाबत पत्र देण्यात आले होते. या पत्रानुसारच चिन्मयानंद यांच्यावर असलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शहाजहाँपूर प्रशासनाने 9 मार्चला बचाव पक्षाच्या अधिकाऱ्याला याबाबतचे खटले मागे घेण्यास सांगितले होते. त्यानुसार हे खटले मागे घेण्यात आले आहेत. 

adityanath

याबाबत राज्य सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ सिंग यांनी चिन्मयानंद यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास सरकारकडून सांगण्यात आले. तसेच जे या निर्णयाविरोधात आहेत, त्यांनी यावर आव्हान द्यायला हवे, असेही सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, उत्तरप्रदेश सरकारने चिन्मयानंद यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यानंतर बलात्कार पीडितेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, उत्तर प्रदेशचे राज्यपाल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली.  

Web Title: UP Government To Withdraw Rape Case Against Former Union Minister Swami Chinmayananda