देशातून कुपोषण होणार हद्दपार; सरकारचे विशेष लक्ष

पीटीआय
Sunday, 29 September 2019

देशभरातील कुपोषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वैज्ञानिक आणि शास्त्रीय उपाययोजनांवर भर दिला असून, सहा राज्यांमध्ये पोषणमूल्ये देखरेख यंत्रणा उभारण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशभरातील कुपोषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वैज्ञानिक आणि शास्त्रीय उपाययोजनांवर भर दिला असून, सहा राज्यांमध्ये पोषणमूल्ये देखरेख यंत्रणा उभारण्यात आली आहे. कुपोषणाचा धोका असलेले लोक आणि प्रत्यक्ष सद्यःस्थितीतील त्यांची अवस्था, यावर या यंत्रणेचा वॉच असेल, असे राष्ट्रीय पोषणमूल्ये संस्थेने (एनआयएन) म्हटले आहे. महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, केरळ, मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोषण अभियान आणि राष्ट्रीय पोषण मोहीम या दोन प्रकल्पांमध्ये एनआयएन ही समन्वयक संस्था म्हणून काम करत आहे. कमी वजनाच्या मुलांचा जन्म, त्यांच्यातील कुपोषण, मुली आणि महिलांमधील ऍनिमिया आदी समस्यांचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कुपोषणाचा धोका असणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येईल, असे एनआयएनमधील संशोधक श्रीराम कृष्ण यांनी सांगितले.

कांदा दरवाढीवर केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय; शेतकऱ्यांमध्ये मात्र संताप

प्रश्‍नावलीतून वेध

कुपोषणाला जबाबदार असणाऱ्या कारणांचा या यंत्रणेच्या माध्यमातून वेध घेतला जाणार असून, यासाठी नऊ प्रश्‍नांचा समावेश असलेली प्रश्‍नावली तयार करण्यात आली आहे. सहा राज्यांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतरच ही प्रश्‍नावली तयार करण्यात आली आहे.

Vidhan Sabha 2019 : ठाकरे घराण्यातून उमेदवार ठरला; आदित्य भरणार अर्ज!

विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याचे रूपांतर डिजिटल प्रश्‍नावलीमध्ये करण्यात आले आहे. हैदराबादेतील एनआयएन टाटा केंद्राने हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. ही प्रश्‍नावली टॅबमध्ये फीड करण्यात आली असून, अंगणवाडी सेविकांमध्ये या टॅबचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या टॅबचा कसा वापर करायचा याचे प्रशिक्षणदेखील अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government working to reduce rate of malnutrition in India