गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा योजनेला पाठिंबा?

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर ६ सप्टेंबरला ऊर्जित पटेल रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर झाले. त्यानंतर काही धोरणांवर नव्याने विचार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विशेषत: राजन यांचा ज्या ‘बुडीत बॅंका’ किंवा ‘बॅड बॅंके’च्या कल्पनेला विरोध होता, तीच कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा पटेल यांचा विचार असल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे. बुडीत बॅंकाच्या सहायाने कर्जांमध्ये अडकलेल्या बॅंकांना आपल्या कर्जधारकांचे बॅड बॅंकेमध्ये रूपांतर करता येणार आहे. 

बॅड बॅंक म्हणजे काय
‘बॅड बॅंक’ अर्थात बुडीत बॅंकेची संकल्पना आर्थिक संकटाच्या वेळी तोट्यातील बॅंकेद्वारे त्याच्या कर्जदारांचे एका नव्या बॅंकेमध्ये स्थलांतर करण्यात येते. या बुडीत बॅंका कर्जांसंबंधी सर्व जबाबदारी उचलणार आहेत.  

कार्यवाहीला वेग
याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘येत्या दोन तीन महिन्यांमध्ये या दिशेने पावले उचलण्यात येणार आहेत. त्यातच नवे गव्हर्नर आल्याने कार्यवाहीला वेग येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर राजन यांना बॅड बॅंकेच्या कल्पनेमध्ये रस नव्हता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

अनेक देशांचे धोरण
केंद्र सरकारच्या धोरण निर्माण प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्याने याबाबत अर्थमंत्रालयाची साथ आवश्‍यक असल्याचे सांगितले. या आधी अनेक बड्या देशांनी बॅड बॅंकेची योजना राबविली असून अजून एकही देशाची ही योजना फसलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

राजन यांचा होता विरोध
कोणत्याही बॅंकेची कर्जवसुलीची जबाबदारी स्वत:ची असते. त्यामुळे कर्जदारांचे बॅड बॅंकांमध्ये रूपांतर करून त्यांची वसुलीच्या जाचातून सुटका करूब घेण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. बॅड बॅंक किंवा गुड बॅंक अशी संकल्पना भारतीय मानसिकतेला मानवणारी नसल्याचे राजन यांचे मत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor urjit patel Patel support to plan?