परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे ध्येय : पंतप्रधान

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

देशातील जनतेला अल्प आणि परवडणाऱ्या दरात औषधांचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : देशातील जनतेला अल्प आणि परवडणाऱ्या दरात औषधांचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

'प्रधानमंत्री भारतीय जनशौधी परियोजना' या योजनेंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील गरिब जनतेला परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आमचा प्रयत्न आहे, की प्रत्येक भारतीयाला आरोग्याच्या देखभालीसाठी परवडणाऱ्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. देशातील काही जनतेला प्रधानमंत्री भारतीय जनशौधी परियोजनेंतर्गत फायदा झाला आहे. यासाठी सरकारकडूनही पावले उचलली जात आहे. तसेच गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला कमी दरात औषधांचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून पुरवठा केला जात आहे. 

दरम्यान, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून, या दिवसाच्या पार्श्वभूमीवर योगा करावा असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Govt aims to provide affordable healthcare to all PM Modi